भारद्वाज पक्षी
इंग्लिश:Greater Coucal
हा भारतात आणि पूर्व आशिया मधे मिळनारा पक्षी आहे. हा भारता पासून दक्षिण चीन व इंडोनेशिया पर्यंत आढळतो.
मराठीत भारद्वाज, कुंभार कावळा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी
डोमकावळ्याच्या आकाराचा आहे. याला इंग्रजीत Greater Coucal or Crow
Pheasant असे म्हणतात तर याचे शास्त्रीय नाव Centropus sinesis असे आहे.
भारद्वाजही ककु कुटुंबातील सदस्य असला तरी हा इतरांच्या घरट्यात आपले अंडे
टाकून निघून जाणारा पक्षी नाही.
झुडपी जंगल, खुले मैदानी प्रदेश, गवताळ प्रदेश अशा भागात आणि मनुष्य
वसतीजवळच राहणे पसंत असलेला भारद्वाज जास्तवेळ जमिनीवर राहतो. नर-मादी
सारखेच दिसतात. लहान-मोठे किडे, पाली, सुरवंट, उंदीर हे याचे मुख्य अन्न आहे.
एकाने कुप कुप कुप करत आवाज सुरू केला की दुसरा लगेच तसाच आवाज काढतो
आणि हा खेळ एका मागे एक ५ ते २० वेळापर्यंत आवाज काढून सुरू राहतो. भारतभर
सर्वत्र आढळणारा हा पक्षी अनेक लोकांचे श्रद्धा स्थान आहे.


No comments:
Post a Comment